अन्नपुर्णा “टेक सोर्स” आणि “गो सोर्स” या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शानदार शुभारंभ..

सावंतवाडी,(प्रतिनिधी):-
आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजगाव उद्यमनगर येथे हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात ४५ स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर यामाध्यमातून आणखीन ६५ स्थानिक तरूण-तरूणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे आवाहन अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ सौ.अन्नपुर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांनी केल आहे.

माजगाव येथे अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्सच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सुरूवातीला श्रीरंग मंजूनाथ आचार्य, अँड. पुष्पलता कोरगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच गो सोर्सचे डेव्हिड क्लेमन्स, हेंसल डॉब्स, सीएसओ डेरिक पर्किन्स आदींच्या हस्ते फित कापून नव्या कार्यालयाच उद्घाटन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात जवळपास ६५ स्थानिक तरूण-तरूणींना रोजगाराची संधी इथे उपलब्ध होणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा असे

आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी गो सोर्स मॅनेजिंग पार्टनर डेव्हिड क्लेमन्स, हेंसल डॉब्स, सीएसओ डेरिक पर्किन्स, अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ सौ.अन्नपुर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे, व्हीपी नटवर शर्मा, सीओओ राहूल मिश्रा, अन्नपूर्णा टेक सोर्स प्रोप्रा. ऐश्वर्या कोरगावकर, भिकाजी कानसे, अँड. पुष्पलता कोरगावकर, श्रीरंग मंजूनाथ आचार्य, अखिलेश कोरगावकर, प्रसाद कोरगावकर , व्यंकटेश शेट आदी उपस्थित होते.

या निमित्ताने विविध स्तरातील मान्यवरांनी कोरगावकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुक केले. यावेळी माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, युवा नेते दिनेश गावडे, अजय सावंत, मोहन शेट, कृष्णा शेट, विराग मडकईकर, अवधूत नाटेकर, संतोष गांवस, दया परब आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्यास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top