मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन..
कुडाळ,ता.१५:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांच्या संयुक्त विद्यामाने हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने २५ तारखेला तहसीलदार कार्यालय समोर सायंकाळी ६ वाजता होणार आहे
स्वस्तिक प्रतिष्ठान मागील गेले सहा वर्षे शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून, यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११ रोख व चषक
द्वितीय क्रमांक ७,७७७ रोख व चषक,
तृतीय क्रमांक ३,३३३ रोख व चषक,
चतुर्थ क्रमांक ३,३३३ रोख व चषक .
तसेच वैयक्तिक स्वरुपात अष्टपैलू खेळाडू –चषक ,
उत्कृष्ट चढाई खेळाडू चषक ,
उत्कृष्ट पकड खेळाडू चषक. अशी बक्षिसे आहेत.
तरी या स्पर्धे करिता क्रीडा प्रेमी, खेळाडू तसेच क्रीडा रसिक यांनी उपस्थित राहून रोमांचक सामान्यांचा आनंद घ्यावा. असे आवाहन मनसे पदाधिकारी आणि स्वस्तिक प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन गुंड याच्या वतीने करण्यात येत आहे.