महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार; राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन..
सावंतवाडी,(प्रतिनिधी):-
महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच शंभर टक्के ग्राउंडची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवावी या कार्यशाळेत भरतीसाठी लागणारे मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे
संपर्क – 902268 6944 /7350219093