बदलत्या जीवनशैलीत कोकणची संस्कृती व सकस आहार आरोग्याचे रक्षण करतो:भूषण सावंत
दोडामार्गलक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “बदलती जीवनशैली व आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग न्यूज चे संपादक औभूषण सावंत उपस्थित होते, तर व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ.रामदास रेडकर, भिकेकोनाळ ग्रामस्थ श्री.गवस आणि…
