सुदन कवठणकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी, व्हीजेएनटी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती!
सावंतवाडीशिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते, माजी मंत्री दीपक केसरकर तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या शिफारशीनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ओबीसी, व्हीजेएनटी जिल्हा प्रमुखपदी सुदन कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात…
