गडनदी प्रदूषण प्रकरणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे निर्देश…
कणकवलीसोनगेवाडी व मराठा मंडळ परिसरातील निवासी संकुले व घरांमधून सांडपाणी गडनदीला जोडणाऱ्या नाल्याद्वारे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या दूषित पाण्यावर कलमठ ग्रामपंचायतीच्या नळयोजनेद्वारे गावाला पाणीपुरवठा होत असल्याने कलमठवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नाल्याद्वारे नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश…
