तपोभूमी दिनदर्शिका २०२६ चे सावंतवाडी पत्रकार कक्षात अनावरण
सावंतवाडी पद्मनाभ शिष्य सांप्रदाय, तपोभूमी, कुंडई (गोवा) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘तपोभूमी दिनदर्शिका २०२६’ चे अनावरण सावंतवाडी येथील तालुका पत्रकार कक्षामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना रेडकर यांनी, तपोभूमीचे कार्य आणि पद्मनाभ शिष्य सांप्रदायाचे सामाजिक व अध्यात्मिक योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्याला…
