मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; पोलिस निरीक्षकांची पाहणी
सावंतवाडीसावंतवाडी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाची सविस्तर पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.दरम्यान, उद्या निकाल जाहीर होणार असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
