सातार्डा-कवठणी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सुदन कवठणकरांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा
सावंतवाडीसातार्डा ते कवठणी या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि संरक्षक भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, अवघ्या काही दिवसांतच हा रस्ता उखडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या आठ दिवसांत या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा शिवसेना ओबीसी व व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाप्रमुख सुदन कवठणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…
