अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूलचा दणका…
मालवण सागरी महामार्गावर गोवा पासिंगचे सहा डंपर जप्त: मालवणमालवण सागरी महामार्गावर अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करणारे गोवा पासिंगचे सहा डंपर काल रात्री तहसीलदार प्रिया परब यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल पथकाने पोलीसांच्या साथीने ही कारवाई केली. सदर सहा डंपर मध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू सापडून आली…
