
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार ; माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांचा आरोप
सिंधुदुर्ग,ता.०१:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर मेल द्वारे कळविण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच सदर विद्यार्थिनीला “उपस्थित प्रमाणपत्र” देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने तर कहरच केला आहे. सातत्याने मैदानी सराव करणाऱ्या या माणगाव हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सावंत हिचे आयुष्यच…