
आसोली गावातील तेजल गावडे हिने मिळविला ‘संगीत विशारद’ पदवीचा पहिला मान!
आजगाव (प्रतिनिधी)आसोली गावातील फणसखोलसारख्या दुर्गम ठिकाणी राहणारी कु. तेजल रवींद्र गावडे हिने नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयतर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल / मे 2025 सत्राच्या परीक्षेमधून ‘संगीत विशारद’ ही पदवी प्रथम श्रेणीतून संपादन केली आहे. तेजल गावडे हिने तिचे ‘विशारद प्रथम’ पर्यंतचे शिक्षण राधाकृष्ण संगीत साधना विद्यालय, आजगाव येथे घेतले आहे. तसेच व ‘विशारद पूर्ण’ शिक्षणासाठी…