
२९ डिसेंबर रोजी सावंतवाडीत माजी कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा!
सावंतवाडी,ता.२२:-एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी आणि कबड्डी खेळाडू राज्यात सुप्रसिद्ध होते. येथील अनेक दिग्गज कबड्डीपटूंनी आपल्या खेळाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. मात्र अलीकडच्या काळात हे वैभव कुठेतरी हरपल्याचे जाणवत आहे. म्हणूनच कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटू यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी…