सावंतवाडी शहर भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर; युवकांना नेतृत्वाची संधी

सावंतवाडी प्रतिनिधी:
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा सावंतवाडी शहर कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिलजी निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरवजी मुळीक तसेच युवा मोर्चा शहर अध्यक्ष हितेन नाईक उपस्थित होते.

या वेळी विविध पदांवर निवड झालेल्या युवकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी लॉरेन्स डिसोझा व संकेत रावळ यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी पंकज तुळसळकर व परेश बावकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून लक्ष्मण राऊळ, साईराज सगम, शशांक मलिक, आकाश चौगुले, शिवा गावडे, प्रज्वल मनीष तेरसे, ऋषिकेश सरमाळकर, प्रसाद दापले, राजेश कावले, विनोद चौगुले, मनीष राऊळ, विजय साटेलकर, सचिन साटेलकर, सुजल दळवी, विशाल गायचोर, निखिल साळगावकर, सोहम राऊळ आणि भाग्येश नाईक यांचा समावेश आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे सावंतवाडी शहरात भाजपा युवा मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळणार असून युवकांच्या सक्रिय सहभागातून पक्षविस्ताराला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top