सहकार मंत्रालय स्थापना दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम..
माणगाव(प्रतिनिधी)
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा-माणगाव यांच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिवस 06 जुलै चे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय,बेनवाडी, माणगाव येथे राबविण्यात आला. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त वीस सुपारी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य संचालक श्री. चंद्रशेखर जोशी शाखा- अध्यक्ष माणगाव श्री. शिवराम गणेश जोशी तसेच सदस्य श्री. अनंत मासंग,श्री.कृष्णा परब,श्री.दशरथ चव्हाण तसेच शाखा व्यवस्थापक श्री. राजेश पास्ते आणि कर्मचारी वर्ग तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. साटम सर आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. सैनिक नागरी पतसंस्था, शाखा- माणगाव या स्थानिक समितीकडून शालेय पोषण आहार बनवण्यासाठी मिक्सर देण्यात आला.