एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश:मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या

राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या एआय वापरास मान्यता दिली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात AI प्रणालीवर काम करणारा पहिला जिल्हा ठरला आहे. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या

शनिवारी मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार जिल्हा मुख्यालयात झाला. राज्याचे मंत्री व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यासह आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करारानंतर जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत एआयचा वापर कसा होणार, याविषयी सविस्तर रूपरेषा जाहीर करण्यात आली.

मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासन विविध विभागांमध्ये एआयच्या माध्यमातून कार्यक्षमता, वेग आणि पारदर्शकता वाढवण्यावर भर दिला आहे. विशेषतः आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृषी, मत्स्य आणि पोलिस प्रशासन या क्षेत्रांमध्ये AI प्रणालींचा उपयोग केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आदर्श आता इतर जिल्हेही घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यालाही एआय वापरास मान्यता मिळाली असून, त्या जिल्ह्याची प्रशासकीय टीम लवकरच सिंधुदुर्गला भेट देणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा एआय प्रकल्पाचे जिल्ह्यातील कामकाजाचे सादरीकरण राज्य मंत्रिमंडळासमोर करणार आहे. असे माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.हा प्रकल्प म्हणजे फक्त तंत्रज्ञान नव्हे, तर जिल्ह्याच्या शासकीय प्रक्रियेत एक क्रांतिकारी पाऊल आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top