सावंतवाडी प्रतिनिधी
आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा गजर केला जात आहे. सावंतवाडीत देखील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज पहाटे विठ्ठलाची पूजा करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी हाती टाळ घेत मनोभावे माऊलीचा गजर केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी आणि कोकणच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त आदि उपस्थित होते.
