सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाजपच्या श्रद्धा सावंत भोसले यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.यावेळी बोलताना संजू परब यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सावंतवाडीच्या विकासासाठी आपण नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांना पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनीही सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. पदभार स्वीकारताना नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
