इन्सुली येथे तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू…

सावंतवाडी प्रतिनिधी
इन्सुली-कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेत जमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला होती.

वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सोनाली ही दररोज सकाळी पायी झाराप-पत्रादेवी बायपासवर यायची. तेथून कंपनीच्या गाडीने कामावर जायची. काल सकाळी ती नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन कामावर जाण्यासाठी निघाली होती. तर तिचे वडील शेर्ला येथील सॉ मिलवर कामावर गेले होते. मात्र, काल सायंकाळी ती कामावर पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, परंतु ती आढळून न आल्याने रात्री बांदा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज सकाळी, ज्या पायवाटेने सोनाली कामावर जायची, त्या पायवाटेजवळील शेळ जमिनीतील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.
[09/07, 6:31 pm] Anand: इन्सुली येथे तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top