कुडाळ अल्पसंख्याक अध्यक्ष पदी जोसेफ डाॅक्टस यांची नियुक्ती..
कुडाळ प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी माणगाव शहराची सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा संघटनात्मक बांधणी संदर्भ विचारविनिमय करण्यात आला. तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले पुढील काही महिन्यांत नगरपंचायत,जिल्हा परिषद,पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत कशी पोहोचवता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोमाने कामाला लागा असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.सभेमध्ये सर्व बूथ प्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
खालील प्रमाणे नियुक्ता जाहीर जोसेफ डॉन्टस कुडाळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष,माणगाव शहर अध्यक्ष योगेश केरकर,माणगाव शहर युवक अध्यक्षपदी रिक्सन शिरोडकर,युवक उपाध्यक्ष पदी गौरव कानडे,माणगाव उप शहराध्यक्ष सचिन परब,तालुका कार्यकारणी सदस्य महेश भिसे, बूथ कमिटी अध्यक्ष यशवंत कोरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली.या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी माणगावच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती मोहन सावंत,जिल्हा सरचिटणीस रुपेश कानडे, जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस तथा तालुका कार्यकारिणी सदस्य दिपक काणेकर, कुडाळ तालुका उपाध्यक्ष राजा धुरी,
क्रिस्तपो डॉन्टस, महेश भर्तू, लक्ष्मण धुरी, दिगंबर नाईक ग्रामपंचायत सदस्य नागेश सावंत,विजय धुरी, केशव भर्तू,दत्ताराम नाईक,महादेव नार्वेकर,सुरेश नाईक,बाबल धुरी, बेळणेकर,विठ्ठल मेस्त्री ,प्रमोद दळवी, बाळू भिसे, प्रकाश आडेलकर, जेवंत कुबल , हरी परब, शरद मेयकर, वसंत कदम, श्री कदम नाणेली माजी सरपंच प्रज्ञेश धुरी,विश्वजीत देवळी,आदी श्री.तेली उपस्थित होते.
जोसेफ डाॅक्टस यांनी माणगाव ग्रामपंचायत माजी सरपंच पद दोन वेळा भूषविले.शांत संयमी तसेच हुशार व्यक्तिमत्व म्हणून ओळख, विविध संस्थाच्या कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून काम केले शासकीय कामाचा तगडा अनुभव सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कुशलता असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जोसेफ डाॅक्टस होय.याच कामाचा अनुभव पाहता पक्षांनी डाॅक्टस यांना अल्पसंख्याक अध्यक्ष पदी जबाबदारी दिली.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
