भाजप युवा नेते संदीप गावडे यांच प्रतिपादन..
सावंतवाडी प्रतिनिधी
आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासमवेत फिटनेसची
अत्यंत गरज आहे. ‘तिरंगा दौड’ सारख्या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून ती पूर्ण होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांगले अधिकारी घडावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक तथा भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी आज येथे व्यक्त केले.
सिंधुदुर्ग भाजप व महेंद्रा अकॅडेमी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा दौड स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथमेश जाधव व मेघा सातपुते यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर लहान गटातून दीप सावंत व सौम्या मेस्त्री हे विजयाचे मानकरी ठरले. तर लहान गटातून द्वितीय क्रमांक मुले यश कडव, पृथ्वीराज राठोड तसेच मुलींमधून आस्था लिंगवत व मैथिली गावडे तर मोठ्या गटातून मुलगे प्रणव भालेकर द्वितीय प्रशांत सुद्रिक तृतीय तर मुलींच्या मोठ्या गटातून रेश्मा पांढरे द्वितीय तर समीक्षा वर तृतीय यांनी यश मिळवले
