सावंतवाडी प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी स्वतः चव्हाण साहेबांनी बैठकीदरम्यान, निवडणूक काळात झालेल्या विशाल परब यांच्या निलंबन मागे घेण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. या घोषणेनंतर सिंधुदुर्ग व कोकणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले असून, पक्षातील एकजूट अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
