आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

माणगाव प्रतिनिधी
माणगाव येथे झालेल्या काल (शिंदे गट) शिवसेनेच्या मेळाव्यात‌‌ उबाठा गटाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ व कालेली ग्रामपंचायत सदस्य सानिका परब,राजन शेळके,विजय चव्हाण, अंजली पेडणेकर,सहयोगीता सावंत यांनी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत (शिंदे गट) शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांचे आमदार निलेश राणे यांनी स्वागत केले.पक्षात आपला योग्य तो सन्मान राखला जाईल.येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका मध्ये भगवा झेंडा फडकला पाहिजे.जोमाने काम करा.विकास कामाचं माझ्यावर सोडा. निधीची काळजी करू नका.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका प्रमुख दिपक नारकर,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते,संजय आंग्रे,महीला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते.जिल्हा सरचिटणीस दादा साईल,सचिन धुरी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top