मालवण प्रतिनिधी
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) विभागाअंतर्गत एनसीसी ट्रेनिंग घेतलेला तसेच टी.वाय.बी.एसी. या वर्गात शिक्षण घेतलेला एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर विनायक मानवर याची इंडियन नेव्ही अग्निवीर मध्ये निवड झाली.
विनायक मानवर हा अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा असून काम करत त्याने कॉलेज शिक्षण केले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत हे विनायक मानवर याला त्याला गेली चार वर्ष मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी आर्मी विंग मधून शिक्षण घेऊन विनायक हा नेव्हीमध्ये भरती झाला.
विनायक मानवर याच्या या यशाबद्दल कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत, कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, सर्व प्राध्यापक, कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे व इतर पदाधिकारी, मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, लेफ्टनंट कर्नल मंडलिक सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर, सुभेदार दिनेश गेडाम सुभेदार यांनी अभिनंदन केले.
