कुडाळ प्रतिनिधी
वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी कृष्णा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली नुकतेच माणगाव खोऱ्याच्या मेळाव्या दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नियुक्त पत्र प्रदान केले या अगोदरही सावंत यांनी कुडाळ विधानसभा सोशल मीडियाची व आमदार निलेश राणे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून जबाबदारी योग्य रीतीने सांभाळल्याने त्यांना या नियुक्तीपदी बढती देण्यात आली
