आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणचा बॅकलॉग भरून काढू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:
ममता वराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा

मालवण प्रतिनिधी
मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक असून तुमचे एक मत इतिहास आणि परिवर्तन घडवणार आहे. विकास मंत्रालयात नाही तर मालवणच्या दारात आणायचा आहे. त्यामुळे येत्या २ तारखेला परिवर्तनाची लाट आणत ममता वराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी येथे केले.

मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आज सायंकाळी येथील टोपीवाला हायस्कूल येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, राजन तेली, संजय आंग्रे, काका कुडाळकर, बाळा चिंदरकर, संजय पडते, महेश कांदळगावकर, मनोज राणे, उमेश नेरुरकर, विजय चव्हाण, दिपलक्ष्मी पडते, ममता वराडकर, प्राजक्ता शिरवलकर, मधुरा तुळसकर, संग्राम साळसकर यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकासकामे आणि सरकारच्या योजनांवर भर देत महायुतीच्या उमेदवार ममता वराडकर यांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणचा बॅकलॉग भरून काढू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top