नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचे आमदार दीपक केसरकरांकडून अभिनंदन..

सावंतवाडी प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top