युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गणेश चतुर्थीनिमित्त घेतेले बाप्पांचे दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी
भाजपचे धडाकेबाज युवा नेते आणि यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांनी बुधवारी सावंतवाडी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त स्नेहभेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या सुख- दुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब यांचं देखील मोठ्या उत्साहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top