सावंतवाडी प्रतिनिधी
भाजप प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार अमित गवंडळकर आणि मेघा दुबळे यांनी आज येथील गणेश मंदिर येथे श्रीफळ वाढवून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
प्रचार शुभारंभाच्या वेळी बोलताना भाजप उमेदवार अमित गवंडळकर यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. गोरगरीब जनतेच्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी मी त्यांच्यापर्यंत स्वतः जाऊन त्यांच्या भावना जाणून घेईन आणि त्या समस्यांवर उपाय काढण्याचा प्रयत्न करेन. तसेच, जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करणार आहे.”
यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
