भाजपाचा वेंगुर्ल्यात भक्तिमय प्रचार शुभारंभ ; उमेदवारांनी घेतले देवतांचे आशिर्वाद..

वेंगुर्ला प्रतिनिधी
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मध्ये स्थानिक देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. परंपरा आणि श्रद्धा जपत प्रभागातील गणपती मंदिर, काका-काकी मंदिर, पिंपाळेश्वर, श्री स्वयंभू मंदिर, लोपाद्रेश्वर मंदिर, ब्राह्मण देवस्थान, लक्ष्मीनारायण मंदिर आणि भवानी देवस्थान येथे श्रीफळ ठेवून विधिवत पूजा करण्यात आली.

शहरात सर्वप्रथम देव-देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्याची परंपरा यावेळीही भाजपाने जोपासली. प्रभाग ३ व ४ मधून भाजपाचे उमेदवार सुहास गवंडळकर, गौरी मराठे, सुधीर पालयेकर आणि आकांक्षा परब यांच्या प्रचाराची सुरुवात भक्तीमय वातावरणात पार पडली.

या प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर यांच्यासह अमेय धुरी, दिनेश धर्णे, मयुरेश फाटक, गौरेश गावडे, भूपेन हादगे, हिमांशू कुडपकर, यतीन कुडपकर, साहील कुडपकर, अंकित राणे, नितीन राणे, अक्षय सावंत, प्रणीत सावंत, बाबल अणसुरकर, दीपक परब, राज परब व यश परब यांची उपस्थिती होती.

स्थानीक कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणि देवदर्शनाच्या मंगल वातावरणात झालेल्या शुभारंभामुळे भाजपाच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top