सावंतवाडी प्रतिनिधी
शिवसेनेचे बेधडक जिल्हाप्रमुख संजू परब हे प्रचारात रात्रंदिवस घाम गाळत आहेत. आपल्या दिलखुलास शैलीमुळे ते प्रचारादरम्यान मतदारांना चांगलेच आकर्षित करत आहेत. बुधवारी आपल्या अनोख्या स्टाईलने प्रभाग क्रमांक १० मध्ये त्यांनी आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन जोरदार प्रचार केला.
यावेळी संजू परब म्हणाले, माझ्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत जशी मला तुम्ही साथ दिली तशीच साथ यावेळी देखील तुम्ही आमच्या तिन्ही उमेदवारांना द्यावी. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आमदार दीपक केसरकर आणि आम्ही सर्व शिवसैनिक कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान संजू परब यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये विशेष लक्ष घातल्याने आता या प्रभागात चांगलीच रंगत पहावयास मिळणार आहे.
