पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश

होय आमच ठरलं सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार..!

युवा नेते विशाल परब:”ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है”

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रत्येक पक्षात कार्यकर्ते खेचण्याची चढाओड सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकर यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विशाल परब यांनी त्यांना मास्टर स्ट्रोक दिलेला आहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील १० ही प्रभागातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.

केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे हे भाजपचेच सत्ताधारी असल्याने भाजपच नगराचा विकास करू शकते या विश्वासाने भाजप नेत्यांवर विश्वास ठेवून प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.परब म्हणाले, सावंतवाडीचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल. भाजपवर प्रेम करणारी माणसं तळकोकणात आहेत. भाजपचा कार्यकर्ता पेटुन उठतो तेव्हा काय होतं हे निकालात दिसून येईल. सावंतवाडीची स्पर्धा पुणे, बारामतीशी आहे‌. सावंतवाडीत राहून इथल्या लोकांची सेवा करण हेच माझं धैय्य आहे. सावंतवाडी, वेंगुर्लेत चांगलं हॉस्पिटल आणावं आम्ही तुमच स्वागत करतो अस आवाहन त्यांनी केल. यावेळी माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विशाल परब यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांसह सर्वपक्षीयांनी प्रवेश केला. यात संतोष तळवणेकर, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, निजान मुल्ला, नजमीन मुल्ला आदींसह १० ही प्रभागातील शेकडो जणांनी पक्षप्रवेश केला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, माजी सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर, सौ. वेदीका परब, माजी नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब, हितेन नाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top