प्रभाग क्रमांक 6 मध्ये देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

देव्या सुर्याजी; समाजकार्याची पोचपावती म्हणून मला जनता मतांच्या रूपाने आशीर्वाद देतील…

सावंतवाडी प्रतिनिधी
शिंदे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी प्रभागात गाठीभेटी, जनसंपर्क व प्रचारयात्रा राबवित जोरदार प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अँड. नीता सावंत कविटकर यांच्यासह शिंदे शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास श्री. सूर्याजी यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले”मी गेली अनेक वर्षे समाजकार्य करत आहे. जनतेने मला सदैव आशीर्वाद दिला आहे. आता या निवडणुकीत हीच जनता माझ्या कार्याची पोचपावती म्हणून मला मतपेटीतून आशीर्वाद देईल, असा पूर्ण विश्वास आहे,” असे श्री. सूर्याजी म्हणाले.प्रचारादरम्यान नागरिकांनीही आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत करत पाठिंबा दर्शवला आहे. प्रभागात विकासाचा ध्यास घेत आम्ही काम करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top