नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले यांनी घेतले नारायण राणेंचे आशीर्वाद…

सावंतवाडी प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या भाजप उमेदवार सौ. श्रद्धा भोसले यांनी आज भाजपचे खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी निलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले आदी उपस्थित होते. सौ. भोसले या सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top