स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली अधिकृत घोषणा!
देवगड प्रतिनिधी
तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच “कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.विष्णू धावडे यांना हा पुरस्कार शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन,आझाद मैदान शेजारी मुंबई येथे
प्रदान करण्यात येणार आहे,
सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि मुख्य सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.विष्णू धावडे हे
व्हाइस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत,
समर्थ न्यूजच्या माध्यमातून
विविध विषयांवर नेहमी आवाज उठवत आहे, कोरोना काळात देखील स्वखर्चाने अन्नधान्य वाटप केले आहे,
२०१९ मध्ये मानवता विकास परिषद मुंबई यांच्या वतीने मानव रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे,
सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात विष्णू धावडे नेहमी सक्रिय असतात त्यांच्या या निवडीने सर्व स्तरातून कौतुक होत आहे,
