राज्य निवडणूक आयोगाची घोषणा; १ डिसेंबर रोजी रात्री १० वा. पर्यंत प्रचार करता येणार
मालवण
महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत
निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचारा साठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता सुधारित आदेश जारी करताना ही मुदत १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. त्या वेळेपासुन सभा/ मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधीत जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण देखील बंद होईल”. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
