परत एकदा परिवर्तनासाठी सज्ज – पालकमंत्री नितेश राणे..
कणकवली प्रतिनिधी
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून कणकवलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रॅलीला कणकवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
