सावंतवाडी प्रतिनिधी
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली. टेंडर, वर्क ऑर्डर काढली, सहकार्य झालं असतं तर एवढ्यात ते उभं राहिलं असतं. मात्र, आम्ही अटी घातल्या नाही तर शासनाने घातल्या असे राजघराण्याचे म्हणणे असेल तर शासनाच्या प्लेन ‘एमओयू’वर सह्या कराव्यात. म्हणजे, त्यांच्याच कुटुंबातील राहीलेली सही देखील होईल.मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटेल व ताबडतोब हे काम सुरू होईल, असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. राजघराण व पालकमंत्री राणे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर मोती तलावामध्ये हॉटेल प्रकल्प संदर्भातील प्रस्ताव आपण कधीच दिला नव्हता. उलट राजवाड्यात हॉटेल करावं असं मी सुचवल होत.मोती तलावाच्या आतमध्ये कुठलाही प्रकल्प यापुढेही केला जाणार नाही. युवराजांच्या विधान हे गैरसमजातून आहे. ते पुढे म्हणाले, नारायण राणेंविरोधातील लढाई ही शांततेसाठी होती. त्यांच्या विरोधात कधीच नव्हती. ज्या ज्यावेळी राणेंसोबत राहीलो तेसुद्धा ठामपणे. २०१४ पासून नारायण राणेंच्या विरोधात दहशतवादाचा मुद्दा घेऊन केसरकरांनी टार्गेट केल्याच्या पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिले. तसेच नारायण राणे यांनी महायुतीन ही निवडणूक लढावी असं जाहीर केलं अताना कुणामुळे युती तुटली हे पालकमंत्र्यांनाही ठाऊक आहे. लोकांच्या मनात गैरसमज होईल असं वक्तव्य मी
केलेलं नाही. नारायण राणेंसह मी दोन वेळा बोललो होतो. रविंद्र चव्हाण यांनी महायुतीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, महायुतीत निवडणूका का झाल्या नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतात. एक जागा आम्हाला व एक जागा भाजपने घ्यावी असा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मालणात रक्कम जप्त झाली त्यासाठी संबंधितावर एफआयआर होण आवश्यक होतं. मात्र, आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल होत असेल तर ते चुकीच आहे. व्यवहाराचे पैसे होते असं त्याच म्हणणं असताना निलेश राणेंनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप केलाय. आजारपणामुळे मी फिरू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा, घरोघरी जाऊन प्रचार केला असता. कणकवलीत शिवसेना पक्ष चिन्हावर लढत नसल्याचे तिथे उपमुख्यमंत्री यांची सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
,मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व्हाव ही संकल्पना मी मांडली
