संजू परब:विकास फक्त दीपक केसरकर करू शकतात…
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. शहराचा विकास करू असं लोक सांगत आहेत. मटका बंद केला म्हणून सांगणाऱ्यानी मटके वाल्यांनाच तिकीट दिलं. मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे इथे मटक्याचा विकास करणार का ? असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला. विकास फक्त दीपक केसरकर करू शकतात. अन्य कुणी विकास करू शकत नाही. स्थानिकांसोबत जनता राहते. मराठी बोलणाऱ्याला सावंतवाडीची जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
