विशाल परब यांचा केसरकरांना टोला
सावंतवाडी प्रतिनिधी
तब्बल चार वेळा आमदारकी दिल्यानंतर देखील ते येथील युवकांसाठी काहीच करू शकले नाहीत. येथील युवक बेरोजगार असून अनेकजण रोजगाराच्या संधी शोधत घरापासून लांब जातात, तेव्हा मनाला वेदना होतात. आता तुमचं वय झालं असून आता तुम्ही आराम करा. आम्ही तुमच्या मुलासारखे असून तुम्हाला चुकीचा सल्ला देणार नाही, असा सल्ला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता दिला.दरम्यान मी काहीच नसताना विकासाच्या, रोजगाराच्या आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक गोष्टी करू शकतो तर तुम्ही मंत्री असताना आणि सावंतवाडी नगरपालिका तब्बल पंचवीस वर्षे तुमच्या ताब्यात असताना काहीच का करू शकला नाही?, असा माझा एक छोटासा तुम्हाला सवाल आहे असाही त्यांनी प्रश्न केला.
श्री. परब यांनी आज प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचार सभा घेतली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी युवा नेते विशाल परब पुढे म्हणाले, या ठिकाणी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यामुळे कोणाला कोणावर टीका करणार नाही या ठिकाणी आपल्याला रोजगार देणारे अनेक प्रकल्प आणायचे आहेत मात्र आचारसंहिता असल्यामुळे आताच काही बोलत नाही मात्र लवकरच या ठिकाणी रोजगार देणारे प्रकल्प आणि असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे यावेळी त्यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता ठिकाणी ते म्हणाले या ठिकाणी गेली पंधरा वर्षे तुम्ही आमदार आहात तर 25 वर्षे नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे असे असताना तुम्ही नेमका विकास का करू शकला नाही आता तुम्ही तुमचं वय झाला आहे त्यामुळे तुम्ही आता आराम करा मी तुमच्या मुलासारखा आहे त्यामुळे मी सल्ला देतो.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले सौ. वेदिका परब, नगरसेवक पदाचे उमेदवार उदय नाईक, सौ. समृद्धी विर्नोडकर, अमित परब आदि उपस्थित होते.
