उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार

हायकोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश…

मुंबई
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने दिली आहे. सिंधुदुर्गसह राज्यात आज काही भागात मतदान पार पडत आहे. तर काही ठिकाणी राज्यात २० डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. आज झालेल्या निवडणुकीचा निकाल संपूर्ण निवडणूक आल्याशिवाय जाहीर करू नका. निवडणूक सगळीकडे होत असताना केवळ काही ठिकाणांचे निकाल जाहीर केल्यास त्याचा परिणाम इतर निकालावर होऊ शकतो. त्यामुळे निकाल आधी जाहीर केल्यास त्या निवडणुकीस न्याय मिळेल असे वाटत नाही, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला. या निवडणुकीचा संपूर्ण निकाल २१ डिसेंबर रोजीच जाहीर केला जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी १० डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. Exit poll देऊ नयेत, असेही कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सध्या मतदान सुरू आहे. आज ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत, त्याचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होता. पण यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता त्याबाबत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. कोर्टाकडून नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल एकाचवेळी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत, पंचायत समितीच्या मतमोजणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top