एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढ्याचा निर्धार
कुडाळ प्रतिनिधी
भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ एसटी आगारच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर (डिगस) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ही निवड कुडाळ येथील भाजपा कार्यालयात नुकत्याच झालेल्या सभेत करण्यात आली. या वेळी उपाध्यक्षपदी शेखर (राजू) गवंडे, कार्याध्यक्षपदी सुनील बांदेकर, सचिवपदी समीर कदम, सहसचिव विनोद चव्हाण, खजिनदार संजय वरक, सहखजिनदार निलेश कसालकर, प्रसिद्धीसचिव शैलेश धामापूरकर यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून रुपेश कानडे व अॅड. राजीव कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच संघटक सचिव संतोष पालव, महिला संघटक वैभवी यसाजी, सदस्य रविंद्र पडोळकर, बाबाजी धुरी, दादासाहेब खंडागळे व विभागीय कार्यकारिणी सदस्य पदी मिथुन बांबुळकर, प्रशांत गावडे, दिनेश शिरवलकर व सोनाली तेरसे यांची निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना जयेश चिंचळकर यांनी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पुढील काळात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
