रिक्षा चालक मालक संघटना व पिंपळपार मित्र मंडळ म्हापण पाट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य लकी ड्रॉ ला उपस्थिती
वेंगुर्ला प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब पुरस्कृत, रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट आणि पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य लकी ड्रॉ’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विशाल परब यांनी स्वतः उपस्थित राहून रिक्षा चालक आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाला संबोधित करताना विशाल परब म्हणाले की, “रिक्षा चालक हा समाजाचा महत्त्वाचा दुवा आहे. कष्टकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हापण आणि पाट परिसरातील संघटनांनी एकत्र येऊन राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.
यावेळी लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंपळपार मित्र मंडळाचे सदस्य आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर नाथा मडवळ, सुरेश ठाकूर, निकिता राऊळ, सुनील करलकर, विकास गावडे माजी सभापती,भुषण देसाई, विशाल वेंगुर्लेकर विद्यमान सदस्य कोचरा,कास गावचे सरपंच प्रवीण पंडित,अमय पै, अनेक स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
