सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच शेतकरी व व्यापाऱ्यांच्या पाठीशी:- मनिष दळवी

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नेहमीच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीने उद्योग-व्यवसायाकडे वळावे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे त्यामुळे येथील युवा पिढीने त्या दृष्टीने उद्योग व्यवसायाकडे वळावे जिल्हा बँक उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या नव्या पिढीला सदैव सहकार्य करत आहे आपण घेतलेल्या कर्जातून उद्योग व्यवसायात कशी उन्नती साधू याकडे उद्योजकांनी लक्ष द्यावे व आपल्या सर्वांगीण विकास साधावा व जिल्ह्यात रोजगाराची संधी वाढवावी. तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि जिल्हा अधिक समृद्ध करण्यासाठी जिल्हा बँक सदैव सहकार्य करेल,” असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.तळवडे येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेचा नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा अत्यंत थाटात संपन्न झाला, याप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील आदर्शवत बँक: डॉ. राजलक्ष्मी गायकवाड(धनश्री मल्टीस्टेट’च्या संचालिका आणि सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी)

कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर-मंगळवेढा येथील ‘धनश्री मल्टीस्टेट’च्या संचालिका आणि सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. राजलक्ष्मी गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राज्यातील एक आदर्श सहकारी बँक आहे. बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे मोलाचे काम या बँकेने केले आहे. या बँकेकडून घेतलेल्या कर्जात ‘बरकत’ असून, याच बळावर आम्ही एका कारखान्यावरून दुसरा कारखाना विकत घेण्यापर्यंत प्रगती करू शकलो.त्यामूळे महिला तसेच युवा पिढीने उद्योग व्यवसायाकडे वळावे व आपला सर्वागीण विकास साधावा असे त्या म्हणाल्या आपण या कार्यक्रमास पंढरपूर या ठिकाणावरून आले आहे या बँकेत आपण आज नवीन शाखा स्थलानतर सोहळा निमित्त आज आपण एक कोटीच्या ठेवी ठेवल्या आहेत. असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सौ राजलक्ष्मी रविराज गायकवाड यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये एक कोटीची ठेवी ठेवून मोठे योगदान बजावले आहे आपण या जिल्हा बँकेचे ग्राहक असून या बँकेवर आपला पूर्ण विश्वास आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले बँकेचे आपण कर्जदार असून या बँकेने आपला उद्योग व्यवसाय वाढीसाठी मोलाचे सहकार्य केले असे म्हटले.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांच्या विश्वासामुळेच बँकेची उलाढाल दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी संचालक विद्याधर परब, गजानन गावडे आणि सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद रामचंद्र गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवर यांचे पुष्पगुच्छ व शाळा देऊन सत्कार करण्यात आला तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेमध्ये नवीन एफडी सुरू करणाऱ्या खातेदारांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याल प्रमुख मान्यवर मनिष दळवी (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक)अतुल काळसेकर (उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक) जिल्हा बँक सचालक विद्याधर परब, गजानन गावडे, रविंद्र मडगावकर , प्रमोद गावडे (खरेदी विक्री संघ सावंतवाडी अध्यक्ष) वनिता मेस्त्री (सरपंच, ग्रामपंचायत तळवडे), प्रमोद गावडे(जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी) बाबुराव परब (अध्यक्ष, तळवडे वि. का. सोसायटी),विलास परब (अध्यक्ष, तळवडे अर्बन क्रेडिट सोसायटी) ,श्यामसुंदर पोकळे (शाखा व्यवस्थापक, तळवडे) तसेच या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शरद सावंत यांनी मांडले.

आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज झालेल्या या नवीन शाखेमुळे तळवडे परिसरातील ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहे. तसेच नूतन ए टीम सुविधा सज्ज स्वरूपात सुरु करण्यात आली आहे. त्यामूळे ग्राहक व्यापारी तसेच अन्य लोकांना यांचा चांगला फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top