कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने एक हात मदतीचा!

कुडाळ

कुडाळ शहरातील माठेवाडा येथे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाची मोठी फांदी खाली असलेल्या स्टॉलवर पडली त्यामुळे त्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. हा स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर यांच्या कुटुंबीयांचा होता या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह यावरच असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. ही घटना समजतात कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने पेडणेकर कुटुंबीयांना तात्काळ २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी माजी जि. प अध्यक्ष संजय पडते, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक ऍड.राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, शहर संघटक राकेश कांदे, उप शहर प्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, विलास वराडकर, दादा जळवी, चंदन कांबळी, राजवीर पाटील, प्रथमेश कांबळी, संदेश सावंत, बाबू हरमलकर, दादा गडेकर, आनंद अनावकर, आणा जळवी, समीर जळवी, युवसेना शाखा प्रमुख राजाराम गडेकर, निलेश जळवी, प्रसाद आळवे, सुजित पावसकर, दर्शन आळवे आदी शिवसेना पदाधिकारी व तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top