सावंतवाडी
ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा २० वा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० मान्यवरांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरव करण्यात आला.
यंदाच्या सोहळ्यात जिल्हास्तरीय पुरस्काराने कांचन उपरकर,शुभेच्छा सावंत, स्नेहा कदम, मंदार चोरगे, सचिन वंजारी, राजाराम फर्जंद, शैलेश तांबे, रोहन पाटील, राजेश कदम, अविनाश म्हापणकर आदींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत सावंत म्हणाले की, “आजच्या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पैशाला महत्त्व दिले जात असताना, केवळ कर्तृत्वाचा विचार करून सन्मान करणे ही मोठी बाब आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडचणींची आम्हाला जाणीव असून,आम्ही नेहमीच संस्थेच्या पाठीशी उभे आहोत.” गजानन नाईक यांनी हा पुरस्कार म्हणजे समाजासाठी दिलेली ‘शाबासकीची थाप’ असल्याचे सांगितले.सीए लक्ष्मण नाईक, अभिमन्यू लोंढे,संप्रवी कशाळीकर आणि रमेश बोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय.पी.नाईक यांनी प्रास्ताविकातून गेल्या १९ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत,पत्रकार गजानन नाईक,सीए लक्ष्मण नाईक,कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे,स्वागताध्यक्ष अभिमन्यू लोंढे, संस्थापक वाय पी नाईक,मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख,सागर चव्हाण, संप्रवी कशाळीकर ,व्ही.टी.देवण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय.पी. नाईक तर सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले,आभार सहसचिव विनायक गांवस यांनी मानले.या सोहळ्याला निलेश पारकर,एस. आर.मांगले,एस.जी.साळगावकर, विठ्ठल कदम,आर.व्ही.नारकर, सुनील नेवगी,दीपक गांवकर, विलास कासकर,सुधीर पराडकर,पांडुरंग काकतकर, एकनाथ घोंगडे,संजय बाबुंळकर यांच्यासह ज्ञानदीप मंडळाचे सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
