भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार.
सावंतवाडी प्रतिनिधी
कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गावकर यांचा जंगी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारिवडे सरपंच भाजपचे आरती माळकर , उपसरपंच महेश गांवकर, अशोक माळकर,तुकाराम आमुणेकर ,प्रतिभा जाधव ( ग्राम सदस्य )
,मायकल डिसोझा,केतन आजगांवकर,स्वप्नील राऊळ (युवा मोर्चा सरचिटणीस मंडळ आंबोली )
रवी सावंत,संतोष बिले स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर महेश गावकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला.
