शिंदे शिवसेनेकडून स्वातंत्र गट स्थापन…

सावंतवाडी
येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी आज ओरस येथे नगर विकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपाने या आधीच नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गट स्थापन केला आहे. एकूणच दोन्ही पक्षाकडून गटस्थापन केल्यानंतर आता उपनगराध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीबाबत हालचाली पाहायला मिळणार आहेत.सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती या लढतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाच्या श्रद्धा सावंत भोसले यांच्यासह भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले होते तर शिंदे शिवसेनेचे सात नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस आणि ठाकरे सेना यांचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला. केंद्रात तसेच राज्यात महायुतीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुती होण्याची शक्यता आहे परंतु महायुती झाल्यास या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पाहायला मिळणार आहे एकूणच याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून आपापल्या नगरसेवकांचे स्वतंत्र गट स्थापन केले आहेत तसे पाहता या ठिकाणी भाजपकडे आवश्यक संख्याबळ असल्याने उपनगराध्यक्ष पद हे भाजपकडेच जाणार आहे परंतु आयत्यावेळी काही गडबड नको यासाठी गटस्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून पुढाकार घेण्यात आला.या ठिकाणी युती झाल्यास निश्चितच उपनगराध्यक्ष पद शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्या तरी इथे संदर्भात काहीच हालचाली किंवा संकेत या ठिकाणी दिसून येत नाही. दोन्ही पक्षाकडून शहरात स्वतंत्र काम पाहायला मिळत आहे एकीकडे भाजपकडून नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी भाजप नगरसेवकांसह शहरातील समस्यांवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे शहरातील स्वच्छतेवर त्याने भर दिला असून दुसरीकडे शिंदे शिवसेनेकडूनही शहरातील विविध समस्यांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे एकूणच सध्या तरी दोन्ही पक्षाकडून स्वतंत्ररित्या शहरातील समस्यांवर काम करताना पाहायला मिळत आहे. मात्र युती झाल्यास या ठिकाणी वेगळ चित्र पाहायला मिळणार आहे.यावेळी नगरसेवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top