सैनिक स्कूल आंबोलीच्या ‘वीर जवान दौड’ला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

४०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग.!

सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्या वतीने आयोजित ‘वीर जवान दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा विविध जिल्ह्यांतून ४०० हून अधिक स्पर्धक सहभागी याले होते
भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करण्यात आलेली ही स्पर्धा आरोग्य आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मोती तलावाच्या काठावरील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचा अधिकृत श्रीगणेशा झाला. राष्ट्रगीतानंतर सैनिक स्कूलचा सिनियर कॅडेट अथर्व पालव याने सर्व स्पर्धकांना शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या, तर क्रीडा शिक्षक मनोज देसाई यांनी स्पर्धेच्या नियमावलीचे वाचन केले. १०, १४, १७वर्षांखालील मुले-मुली आणि खुला गट अशा विविध सात वयोगटांत ही चुरशीची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांना सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि कर्नल विजयकुमार सावंत या मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, पदक, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सैनिक स्कूलचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डोन्टस, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेविका दिपाली भालेकर, सुनीता पेडणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, डॉ. स्नेहल गोवेकर, कॅथलिक पतसंस्थेच्या संचालिका डिसोजा मॅडम, प्राचार्य नितीन गावडे, निवृत्त प्राचार्य सुरेश गावडे, क्रीडा शिक्षक शैलेश नाईक, प्रल्हाद तावडे यांसह शाळा व पतसंस्थेचे कर्मचारी, सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशनचे सदस्य आणि सावंतवाडीतील क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेसाठी आर्या क्लिनिकच्या डॉ. सुनीता म्हाडगूत व भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक कॉलेज यांनी दिलेल्या अमूल्य वैद्यकीय सेवेबद्दल आयोजकांतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. गावडे व क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांनी केले.

या स्पर्धेत १० वर्षांखालील मुले गटात स्वराज संदीप सावंत याने प्रथम, सर्वेश संतोष कापडी याने द्वितीय तर निर्मय संतोष रेडकर याने तृतीय क्रमांक

पटकावला. १० वर्षांखालील मुलींत हिंदवी जयराम दळवी प्रथम, स्पृहा भूषण नार्वेकर द्वितीय व काव्या अर्जुन राऊळ तृतीय आली. १४ वर्षांखालील मुलांमध्ये वेदांत युवराज पाटील, भावेश संतोष यादव व वेदांत विनायक भोपळे यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले, तर मुलींच्या गटात अनन्या दीपक कुंभार प्रथम, आस्था अमित लिंगवत द्वितीय व श्रावणी भिवा महाडेश्वर तृतीय आली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात जयेद समीर शेख याने प्रथम क्रमांक मिळवला, तर सुनील बाबुराव जंगले व यश प्रकाश कडव यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महिलांच्या खुल्या गटात मेघा प्रमोद सातपुते हिने प्रथम, रेश्मा रावबा पांढरे हिने द्वितीय व तेजस्वी भरत गावडे हिने तृतीय स्थान मिळवले. पुरुषांच्या खुल्या गटात ओमकार विष्णू बैकर याने विजेतेपद पटकावले, तर आदित्य आनंद राऊळ व ओम उन्हाळकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top