सावंतवाडी,ता.०७: तालुक्यातील न्हावेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नं.१ शाळेला शनिवार १४ डिसेंबर रोजी ११० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त सुपर शताब्दी महोत्सवी वर्षे साजरा करण्यात येणार आहे.
पुढीलप्रमाणे कार्यक्रम सकाळी ११ ते १ वाजता न्हावेली गावातील सर्व महिलांसाठी खुली रांगोळी स्पर्धा दुपारी १ ते २ वाजेपर्यत भोजन, दुपारी ३ ते ४ वाजता महिलांसाठी खास संगीत खुर्ची स्पर्धा,संध्याकाळी ४ ते ५ वाजता महिलांसाठी खास खेळ पैठणीचा संध्याकाळी ५ ते ७ वाजता शाळेतील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा रात्री ७ वाजता भूमिका दशावतार नाट्यमंडळ मळगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन माजी विद्यार्थी व ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले आहे.
